सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जळगावमध्ये मुस्लिम मतदारांना पटवण्याचा 'विशेष' कार्यक्रम – जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश वादग्रस्त!

जळगाव जिल्ह्यातील मुस्लिम मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी प्रशासनाने धडाकेबाज मोहिम राबवली आहे.

Sudarshan MH
  • Nov 14 2024 11:48AM

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील मुस्लिम मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी प्रशासनाने धडाकेबाज मोहिम राबवली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम समाजासाठी एक 'विशेष' मतदान जनजागृती कार्यक्रम आखण्यात आला आहे. हा कार्यक्रम पाहून अनेकांमध्ये संभ्रम व नाराजी व्यक्त होत आहे.

 
कार्यक्रमांतर्गत, मुस्लिम समुदायासाठी चित्रकला स्पर्धा, महिला मदत केंद्रांमध्ये मुस्लिम महिलांसाठी विशेष मार्गदर्शन, तसेच मुस्लिम धर्मगुरूंमार्फत नमाजच्या वेळेस जनजागृती अभियान चालविण्यात येणार आहे. इतकेच नव्हे, तर मुस्लिम महिलांमध्ये मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी विशेष योजना आखण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये मुलींना घरभेटी देऊन महिलांना मतदानाचे महत्त्व पटवण्याचे निर्देश दिले आहेत.
 
हा विशिष्ट समुदायासाठी घेतलेला 'तळमळीचा' हा उपक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी का राबवला? इतर समाजातील मतदारांनाही अशीच जनजागृतीची गरज नाही का? का एकच समाज गाठण्यासाठी हा आटापिटा? अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या कार्यक्रमातून एकाच समाजाला टार्गेट करून मतदान वाढवण्याच्या उद्दिष्टामुळे, प्रशासनाचे हेतू संशयास्पद ठरत आहेत.
 
मतदान प्रक्रियेत विशिष्ट समुदायाचा 'खास' सहभाग वाढविण्याच्या या मोहिमेमुळे इतर समाजांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे, आणि या विशेष मोहिमेमुळे प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोपही होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार