सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रच सरस, देशात महाराष्ट्रच प्रथम स्थानावर आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहा महिन्यांतच वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के गुंतवणूक झाली असून, देशात महाराष्ट्रच प्रथम स्थानावर आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Sudarshan MH
  • Jan 4 2025 2:57PM
मुंबई: महाराष्ट्रातील उद्योग परराज्यांत जात असल्याची टीका विरोधकांकडून महायुती सरकारवर वारंवार होत असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेशी गुंतवणुकीची वर्षभराची सरासरी सहा महिन्यांतच गाठल्याची आकडेवारी शुक्रवारी दिली. ‘सहा महिन्यांत १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. सहा महिन्यांतच वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के गुंतवणूक झाली असून, देशात महाराष्ट्रच प्रथम स्थानावर आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
 
फडणवीस यांनी ‘एक्स’वर याबाबत माहिती दिली आहे. ‘परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात महाराष्ट्र सातत्याने अग्रेसर आहे. सन२०२४-२५ या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्‍या तिमाहीची आकडेवारी प्रसिद्ध झाली असून, अवघ्या सहा महिन्यांत १ लाख, १३ हजार २३६ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे’, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. ‘गेल्या ४ वर्षांतील सरासरी पाहिल्यास १,१९,५५६ कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या ९४.७१ टक्के गुंतवणूक फक्त ६ महिन्यांत आली आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले. फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, सहा महिन्यांतील परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून, कर्नाटक दुसऱ्या, गुजरात तिसऱ्या, दिल्ली चौथ्या आणि तमिळनाडू पाचव्या क्रमांकावर आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार