सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यात धर्मांतरासाठी एका महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार; आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याचा व्हिडिओ केला मोबाईलमध्ये कैद!

याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Jan 24 2025 12:43PM

पुणे: पुण्यामध्ये पतीने कात्रीच्या सहाय्याने पत्नीची हत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना ताजी असतांनाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या लोहगाव परिसरात धर्मांतरासाठी एका महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. लागोपाठ घडणाऱ्या अशा दोन धक्कादायक घटनांमुळे पुणे हादरले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये धर्मांतर करण्यासाठी दोघांनी ३२ वर्षीय महिलेला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित महिला पुण्यातील लोहगाव परिसरात राहायला असून एका जिम ट्रेनरकडे जिम लावण्यासाठी गेल्यानंतर त्या दोघांची ओळख झाली. यानंतर तिला धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करून एका ५५ वर्षे आरोपी आणि ३० वर्षीय आरोपीने बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी ते महिलेला देत होते. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून याप्रकरणात २ पुरुषांसह एका महिलेवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार