सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी स्वराज्य पक्षांचा हदगाव तहसीलवर धडकला बैलगाडी आक्रोश मोर्चा

शेतकऱ्यांना तात्काळ मदत नाही दिल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा स्वराज्य पक्षाचे नेते माधवराव पाटील देवसरकर यांनी प्रशासनाला दिला.

Sudarshan MH
  • Sep 18 2024 5:54PM
हदगाव: हदगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे, गुराढोरांचे, घरांचे, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे अजूनही प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई न दिल्यामुळे आज हदगांव येथे स्वराज्य पक्षाच्या वतीने माधवराव पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा बैलगाडी मोर्चा जिल्हा परिषद हायस्कूल शाळेपासून बस स्टॅन्ड मार्गे हदगाव तहसीलवर धडकला, या मोर्चामध्ये आजूबाजूच्या खेड्यातील हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
 
शेतकऱ्यांना तात्काळ मदत नाही दिल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा स्वराज्य पक्षाचे नेते माधवराव पाटील देवसरकर यांनी प्रशासनाला दिला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी कांबळे व हदगाव तहसीलचे तहसीलदार विनोद गुंडमवार यांना दिले. यावेळी मोर्चेकर्‍यांच्या मागण्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन उपविभागीय अधिकारी कांबळे व हदगाव तहसीलचे तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी मोर्चेक-यांना दिले.
 
- अरविंद जाधव...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार