सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जामनेरमध्ये ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक; संतप्त जमावाची पोलीस ठाण्यात तोडफोड, १२ पोलीस कर्मचारी जखमी

आरोपी सापडत नसल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी एलसीबीकडे तपास वर्ग केल्यानंतर अवघ्या अर्ध्यातासात संशयिताला भुसावळमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

Shruti Patil
  • Jun 21 2024 10:31AM

जामनेर: सहा वर्षाची चिमुकली घरात एकटी असल्याचे पाहून तसेच तुला खाऊ घेऊन देतो, असे आमिष दाखवत गावा शेजारीच असलेल्या शेतात नेवून तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिचखेडे बुद्रुक गावाजवळ दि. ११ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली होती. घटना घडल्यापासून संशयित आरोपी सुभाष उमाजी भील (वय ३५) हा फरार होता. आरोपी सापडत नसल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी एलसीबीकडे तपास वर्ग केल्यानंतर अवघ्या अर्ध्यातासात संशयिताला भुसावळमधून ताब्यात घेण्यात आले आहे.

या आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्थानकासमोर ३०० ते ४०० नागरिकांचा जमाव जमला होता. या संतप्त जमावाने पोलिसांकडे त्या आरोपीला जमावाच्या स्वाधीन करण्याची मागणी केली होती, मात्र मागणी मान्य न झाल्यामुळे या नागरिकांनी पोलीस स्थानकासमोरील रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत जाळपोळ सुरू केली. मात्र पोलिसांनी जमावाला शांतता ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर संतप्त जमावाने जामनेर पोलीस स्थानकावर दगडफेक करायला सुरुवात केली. त्या दगडफेकीमध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त हा जामनेर शहरात तैनात करण्यात आला असून जामनेर शहरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार