नंदुरबार: ईद - ए - मिलादनिमित्त १९ सप्टेंबर रोजी नंदुरबार, दोंडाईचा (जिल्हा धुळे) आणि जालना येथे काढण्यात आलेल्या जुलूसात जिहाद्यांनी हिंदूंवर आक्रमण केले. तसेच हिंदूंच्या घरांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत हिंदूंच्या वाहनांचीही प्रचंड नासधूस केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या १५ नळकांड्या फोडल्या. यावेळी जिहाद्यांनी हातात औरंगजेबाच्या समर्थनाचे फलक झळकवले. दुपारी २ वाजता जुलूसाच्या वेळी ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
इलाही चौक परिसरातून मिरवणूक माळीवाडा परिसरात आल्यानंतर दगडफेकीची अफवा पसरली. त्यामुळे पोलिसांनी मिरवणूक थांबवली. त्यानंतर जिहाद्यांनी अचानक जोरदार दगडफेक चालू केली. शांततेचे आवाहन करत असलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. या चकमकीत नंदुरबार येथे ४ पोलिसांसह १० नागरिक घायाळ झाले. तीन ही शहरांतील दंगलीची परिस्थिती बघता जिहाद्यांनी पूर्वनियोजित कट करूनच हा धिंगाणा घातल्याचे स्पष्ट होते.
जिहाद्यांनी पोलीस अधीक्षकांच्या वाहनांसह खासगी वाहनांची तोडफोड केली, तसेच ३ घरे आणि ३ दुचाकींना आग लावण्याचा प्रयत्न केला. नवनाथनगर परिसरातील २ घरांच्या जाळपोळीसह २ सिलेंडरलाही आग लावण्याचा प्रयत्न झाला. या घटनेचे काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्याने शहरातील इतर भागांत तणाव निर्माण झाला. परिणामी तेथील व्यापार्यांनी दुकाने बंद केली. शालेय विद्यार्थ्यांनाही लवकर घरी सोडण्यात आले.
दंगलखोरांविरुद्ध कठोर कारवाई करणार ! – पोलीस अधीक्षक, नंदुरबार...
या घटनेविषयी बोलतांना नंदुरबारचे पोलीस अधीक्षक एस्. श्रवण दत्त म्हणाले की, आरोपींना सोडणार नाही. शहरातील परिस्थिती नियंत्रणात आली असून सर्वांनी शांतता राखावी. सामाजिक माध्यमांत कुठल्याही प्रकारचे आक्षेपार्ह अथवा नागरिकांची माथी भडकावणारे व्हिडिओ प्रसारित केल्यास त्यांच्याविरुद्धही कठोर कारवाई केली जाईल. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
जुलुसाच्या वेळी धर्मांधांनी आक्षेपार्ह घोषणा देऊन गाणी लावत तेढ निर्माण केला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करून तेथे पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावत देशद्रोही फुत्कार सोडले. यावेळी धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीत २२ जण घायाळ झाले, तर अनेक वाहनांच्या काचा फुटल्या. या घटनेनंतर शहरात अफवा पसरल्याने वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक झाली. भाजपचे आमदार जयकुमार रावल यांच्या घरावरही धर्मांधांनी तुफान दगडफेक केली.
जालना येथील जुलुसाच्या वेळी एम्. आय. एम्. चे अकबरुद्दीन ओवैसी यांचे ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवल्यास आम्ही १०० कोटी हिंदूंना संपवू’, हे वादग्रस्त विधान असलेल्या आशयाचे गाणे ‘डीजे’वर लावण्यात आले होते. त्यानंतर धर्मांधांनी हिंदूंच्या दुकानांची तोडफोड करून लूट केली. या वेळी पोलीस प्रशासन हतबल दिसत होते.