सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अक्कलकुवा मतदार संघात 5 अतिदुर्गम मतदान केंद्रे; सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत होणार मतदान -डॉ. मित्ताली सेठी

नंदुरबार, दिनांक 13 नोव्हेंबर, 2024 भारत निवडणूक आयोगाने नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातील अतिदुर्गम असलेल्या 5 मतदान केंद्रांची मतदानाची वेळ 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 अशी निश्चित केली असल्याचे असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे

Sudarshan MH
  • Nov 13 2024 2:13PM
अक्कलकुवा मतदार संघात 5 अतिदुर्गम मतदान केंद्रे; 
सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत होणार मतदान
-डॉ. मित्ताली सेठी
 
नंदुरबार, दिनांक 13 नोव्हेंबर, 2024
भारत निवडणूक आयोगाने नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातील अतिदुर्गम असलेल्या 5 मतदान केंद्रांची मतदानाची वेळ 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 अशी निश्चित केली असल्याचे असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
 
अक्कलकुवा (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील नर्मदा काठावरील अतिदुर्गम (बार्जने जाणारे) मणीबेली, चिमलखेडी, बामणी, डनेल व मुखडी ही 5 मतदान केंद्रे अत्यंत दुर्गम भागात असून सातपुडा पर्वत रांगेत नर्मदा काठावर वसलेले आहेत. या मतदान केंद्रांवर पोहचण्यासाठी प्रथम रस्ते मार्ग, नंतर बोटीतून प्रवास करावा लागतो व त्यासाठी वेळही जास्त लागतो. तसेच मतदानानंतर मतदान केंद्रांवरुन परत येतांना देखील तेवढाच वेळ लागतो. त्यामुळे या मतदान केंद्रावर मतदान सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत होणार आहे, यासाठी भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे, असेही डॉ. सेठी यांनी नमूद केले आहे.
 
सकाळी ७.०० ते दुपारी ३.०० या वेळेत होणाऱ्या या अतिदुर्गम मतदान केंद्रात मतदान केंद्र क्रमांक १ चे मणीबेली (मतदार संख्या ३५५), मतदान केंद्र क्रमांक ७ चिमलखेडी (मतदार संख्या ४८०), मतदान केंद्र क्रमांक १० बामणी (मतदार संख्या ८२४), मतदान केंद्र क्रमांक १२ डनेल (मतदार संख्या ८६५), मतदान केंद्र क्रमांक १३ मुखडी (मतदार संख्या २९१) अशा एकूण पाच अतिदुर्गम मतदान केंद्रांवरील २ हजार ८१५ मतदारांना सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत मतदान करावे लागणार आहे. या बदलाबाबत सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सेठी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार