सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत दगडूशेठ तर्फे १२ हजार वारकऱ्यांची नेत्र व आरोग्य तपासणी

आरोग्य शिबिरात डोळ्यांची तपासणी, चष्मे वाटप यांसह वारकऱ्यांना प्रवासादरम्यान येणाऱ्या विविध आरोग्यविषयक अडचणींची तपासणी करण्यात आली.

Shruti Patil
  • Jul 1 2024 5:35PM
पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोर जय गणेश प्रांगण येथे वारकऱ्यांसाठी आयोजित नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरात १२ हजारहून अधिक वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगीकारून ट्रस्ट कार्यरत असून २५ हजार वारकऱ्यांना सकाळचा नाश्ता व चहा देखील देण्यात आला.
 
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा, हे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या आरोग्य सेवेच्या कार्यात वारकऱ्यांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर हा एक भाग आहे. या आरोग्य शिबिरात डोळ्यांची तपासणी, चष्मे वाटप यांसह वारकऱ्यांना प्रवासादरम्यान येणाऱ्या विविध आरोग्यविषयक अडचणींची तपासणी करण्यात आली. विनामूल्य अंगदुखी, डोकेदुखी, बीपी, शुगर यांसारख्या आजारांवर औषधे देखील देण्यात आली. तसेच ज्यांना नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल, त्यांना विनामूल्य शस्त्रक्रिया देखील करुन देण्यात येणार आहे. शिबिरामध्ये ६२ डॉक्टरांसह अनेक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
 
शिबीर प्रसंगी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी यांसह सुवर्णयुग तरुण मंडळ आणि सुवर्णयुग सहकारी बँकेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार