सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संगमनेर लव्ह जिहाद प्रकरणी पोलिसांवर दबाव आणलेला असेल तर त्याचे पुरावे सादर करावे - खा. निलेश लंके

संगमनेरमधील लव्ह जिहाद प्रकरणी मी पोलिसांवर दबाव आणल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे खा. निलेश लंके यांनी स्पष्ट केले आहे.

Sudarshan MH
  • Jul 30 2024 10:03PM
अहिल्यानगर: संगमनेर येथील लव्ह जिहाद प्रकरणात खा. निलेश लंके यांनी संबंधित घटनेतील मुख्य आरोपी दाऊद शेख हा शरद पवार गटाचा असल्याकारणाने त्याला वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचे समजले होते. यासंदर्भात खा. निलेश लंके यांच्याकडे सुदर्शन मराठीने संपर्क साधला असता त्यांनी स्पष्टीकरण दिले, की 'संगमनेर येथील लव्ह जिहाद प्रकरणी त्यांनी कोणत्याही प्रकारे पोलिसांवर दबाव आणलेला नाही. मी बेकायदेशीर कामांना पाठिंबा देत नाही. त्यामुळे एखाद्या बेकायदेशीर कामासाठी पोलिसांवर मी दबाव आणला, असे सांगून एखाद्या प्रकरणाशी माझा संबंध जोडू नका' असे त्यांनी म्हणले आहे.

 

संगमनेरमधील लव्ह जिहाद प्रकरणी मी पोलिसांवर दबाव आणल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच असे काही घडले असेल, तर त्यासंदर्भात पुरावे सादर करावे, मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला किंवा पोलिस कर्मचाऱ्याला या घटनेसंदर्भात संपर्क केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार