जेजुरी: आज सासवड मधून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जेजुरी मध्ये आला आहे. लाखोच्या संख्येने भाविक जेजुरी मध्ये खंडोबाच्या दर्शनासाठी जमा झाले आहेत. मंदिर प्रशासनाने भाविकांची कोणत्याही प्रकारे हाल होऊ नये याची पूर्णतः काळजी घेतली आहे. 'येळकोट - येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट' म्हणत लाखो वारकरी जेजुरीचा गड सर करत आहे.
सासवड मधून पालखी सोहळा निघाल्यानंतर वारकरी जेजुरीमध्ये मुक्कामास असतात. जेजुरी येथील स्थानिक प्रशासनाने वारकऱ्यांसाठी जागोजागी पाण्याची सुविधा, रस्त्यात खाण्यापिण्याची व्यवस्था पुरेपूर व्यवस्था केलेली आहे. उद्या सकाळी जेजुरी येथून पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होईल.