सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मा.जिल्हाधिकारी साहेब परभणी यांच्या हस्ते गौमातेचे पूजन संपन्न

महाराष्ट्र शासनाने गौमातेला "राज्यमाता" दर्जा दिल्यामुळे सकल हिंदू समाज, गौसेवक, गौप्रेमी आनंद व्यक्त करत आहे.

Sudarshan MH
  • Oct 5 2024 1:57PM
परभणी: महाराष्ट्र शासनाने गौमातेला "राज्यमाता" दर्जा दिल्यामुळे सकल हिंदू समाज, गौसेवक, गौप्रेमी, गौशाळा संचालक अत्यंत आनंदीत झाले आहेत. सर्वांना झालेल्या आनंदाला अभिव्यक्त करण्यासाठीच दिनांक 4 ऑक्टोबर 2024 शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे, माननीय जिल्हाधिकारी श्री रघुनाथजी गावडे साहेब यांच्या हस्ते प्रत्यक्ष गोमातेचे पूजन आरती करुन, सर्वांच्या उपस्थितीत गौमाता "राज्यमाता" आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. 
 
यावेळी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्या वक्तव्यातुन महाराष्ट्र राज्य शासनाने "गौमातेला राज्यमाता" दर्जा दिल्या मुळे बरेच वर्षा पासुन गौमाते बद्दल सर्व स्तरावर ही मागणी होत असलेली पुर्ण झाली आहे,यामुळे आता भाकड,वृद्ध गौमातेची ही सेवा होईल त्या कत्तली पासून वाचतील असे अवर्जुन सांगितले, विशेषतः गाय ही अत्यंत उपयोग आहे गाईचे दुध,दही,तुप हे सर्व पौष्टिक आहेच पण गौमुत्र आणि शेणा द्वारे ही विषमुक्त शेंद्रीय शेती होऊन सकस अन्नधान्याची प्राप्ती होईल असेही नमूद केले.
 
याचबरोबर मा.निवासी जिल्हाधिकारी अनुराधाताई ढालकरी मँडम यांनी गौमाता चारा पाण्या साठी शासनाने परिपोषण योजने द्वारे प्रती गोवंश प्रती दिन 50 ₹ घोषित केल्याचे सांगुन याबद्दल समाधान व्यक्त केले.
 
याच वेळी परभणी जिल्हा गोशाळा महासंघाचे अध्यक्ष गौ आश्रीत श्री संदीपभाईजी शर्मा नवोदय रामकृष्णहरी बहुउद्येशीय सेवाभावी संस्था ईटोली जिंतुर यांनी आपल्या वक्तव्यात महाराष्ट्र राज्य शासनाचे *मा.ना.श्री एकनाथरावजी शिंदे साहेब,* मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, *मा.ना.श्री देवेंद्र फडणवीस साहेब,* उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, *मा.ना.श्री अजितदादा पवार साहेब,* उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, *मा.ना.श्री राधाकृष्णजी विखे पाटील,* पशुसंवर्धन मंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच *गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री शेखरजी मुंदडा साहेब,* सदस्य श्री सुनीलजी सुर्यवंशी साहेब,डॉ श्री नितीनजी मार्केंडेय साहेब यांना धन्यवाद देऊन *गौमातेला राज्यमाता* दर्जा दिल्या बद्दल आभार मानत सांगितले की भारतात महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्यांनी गौमातेला राज्यमाता दर्जा दिला आहे.आता सर्व हिंदू समाज, गोप्रेमी,गौरक्षक,गौशाळा संचालक यांची एकच इच्छा आहे, जसे महाराष्ट्र शासनाने *"गौमाता राज्यमाता"* म्हणून घोषित केली अश्याच प्रकारे भारत सरकारने ही *"गौमाता राष्ट्रमाता"* म्हणून घोषित करावी अश्या प्रकारे मागणी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार