चिपळूण: चिपळूण मधील कुंभार्ली घाटमाथ्यावर कराडच्या दिशेने गोवंश घेऊन जाणार्या एका ट्रकविषयी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आणि गोरक्षकांना माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या साहाय्याने या ट्रकवर कारवाई करण्यात आली. या ट्रकमध्ये २२ गोवंश असून त्यांना कराड येथे नेण्यात येत होते. या ट्रकचा मालक बागवान हा कराड येथील आहे.
या प्रकरणी अलोरे - शिरगाव पोलीस ठाण्यात गुरांच्या बेकायदा वाहतुकी प्रकरणी इकबाल खेरटकर आणि ट्रकचालक नलावडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आणि गोरक्षकांना गोवंशांच्या तस्करीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर वाहतूक करणारा ट्रक कुंभार्ली घाटात आला असतांना तेथील पोलिसांनी ट्रकला थांबवले. तोपर्यंत तिथे हिंदुत्ववादी कार्यकर्ते पोहचले. या सर्वांसमोर या ट्रकची तपासणी केली असता, ट्रकमध्ये २२ गोवंशीय कोंबलेले आढळून आले, यामध्ये ३ गोवंश घायाळ झाले होते.