सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नागपूरात गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याच्या H5N1 व्हायरसने बळी; महाराष्ट्रात अलर्ट जारी

नागपूरातील हा व्हायरस सापडल्याने नागपूरातील अधिकाऱ्यांना सर्व प्राणी संग्रहालयात अलर्ट जारी केला आहे.

Sudarshan MH
  • Jan 6 2025 1:05PM
नागपूर: महाराष्ट्रातील नागपूरामधील गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याच्या H5N1 व्हायरसने बळी घेतल्याने खळबळ उडाली आहे. एका वाघाचा मृत्यू २० डिसेंबर रोजी झाला होता. तर अन्य दोघा वाघांचा २३ डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे नमुने पाठविण्यात आले होते.
 
आयसीएआर - नॅशनल इंस्टिटयूट ऑफ हाय सिक्युरिटी एनिमल डिसिज येथे नमूने तपासल्यानंतर हे नमूने H5N1 पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. या प्रयोगशाळेचा अहवाल १ जानेवारी रोजी आला. त्यातून कळले की या प्राण्यांचा मृत्यू H5N1 व्हायरसने झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर राज्यातील प्राणी संग्रहालयाला अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या अधिकारी या प्राण्यांना संसर्ग कोणाकडून झाला? याची तपास करीत आहे.
 
तीन वाघ आणि बिबट्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर प्राणी संग्रहालयातील २६ बिबटे आणि १२ वाघांची चाचणी करण्यात आली. परंतू त्यांच्यात कोणताही विषाणू आढळले नाहीत. बर्ड फ्लू अर्थात H5N1 व्हायरस १०८ देशात आढळला आहे. नागपूरमध्ये हा व्हायरस आढळल्याने महाराष्ट्र शासनाला अधिकाऱ्यांनी पत्र लिहिले आहे. नागपूर येथील व्हायरसच्या या प्रार्दुभावामुळे सर्वांना प्रतिबंधात्मक उपाय करण्यास सांगितले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार