पुणे: काही दिवसांपूर्वी स्वारगेट पोलिसांनी बांगलादेशी घुसखोर जिहादी एहसान शेखला अटक केली होती. त्याच्याकडून ८ पॅनकार्ड, १५ आधारकार्ड, २ मतदान ओळखपत्र, वाहन चालवण्याचे २ परवाने, ३ पारपत्र, ९ डेबिट कार्ड, ८ क्रेडिट कार्ड, ७ उद्योग आधारपत्र, शाळा सोडल्याचे ३ दाखले आणि ८ जन्मदाखले अशी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
आरोपीकडून पाकिस्तान, सौदी अरेबिया, कुवैत, कतार, यूएई आणि मलेशिया या देशांच्या चलनी नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अशा घुसखोरांना अशा प्रकारची कागदपत्रे सिद्ध करून देणार्यांना अटक करण्यात येणार आहे. एहसान शेख याने अनेक नावे धारण करून सर्व कागदपत्रे गोळा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एहसान शेख हा बांगलादेशी असल्याचा संशय आल्याने हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. आरोपी बांगलादेशातील मैमनसिंह जिल्ह्यातील सोनकंदा बाजार येथे रहाणारा आहे. वर्ष २००४ मध्ये दलालांच्या साहाय्याने भारतामध्ये घुसखोरी केली. प्रथम कोलकाता नंतर कर्णावती, तसेच मुंबई येथे राहिला. वर्ष २००९ मध्ये तो भोसरी येथे कामासाठी आला. वर्ष २०१२ पासून तो सहकारनगर भागातील महर्षिनगर येथे रहात होता.