सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचा नांदेड मधील हदगाव भागात ओला दुष्काळ पाहणी दौरा; शेताच्या बांधावरून थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन

हदगाव तालुक्यातील उंचाडा या गावातील नुकसानीची सरकारने तात्काळ भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

Sudarshan MH
  • Sep 9 2024 4:04PM

हदगांव: नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा जोरदार फटका आहे. या भागातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी व शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी सकाळी ८ वा. शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली व शेतकरी बांधवांना धीर दिला.

हदगाव तालुक्यातील उंचाडा या गावातील नुकसानीची सरकारने तात्काळ भरपाई द्यावी, शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. पुढील ४ दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी, अशी मागणी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली. 
 
नांदेड मधील दौऱ्यानंतर छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी व इतर घटक पक्ष परभणी भागातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करणार आहेत. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत आणि सरकारने सरसकट भरीव मदत करावी, अशी मागणी यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. यावेळी स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष, कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.
 
- अरविंद जाधव...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार