सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुप्रसिद्ध व्हीनस कंपनीने प्रसिद्ध चित्र - शिल्पकार प्रमोद कांबळे सन्मानार्थ त्यांच्या नावाने काढली नवी ब्रश मालिका

प्रमोद कांबळेज् मास्टरस्ट्रोक, आर्टिस्ट प्रमोद कांबळे गोल्डन ज्युबिली कलेक्शन ब्रश या नावाने हे ब्रश बाजारात आणण्यात आले आहे.

Shruti Patil
  • Jun 13 2024 12:49PM

अहिल्यानगर: अहिल्यानगर मधील जगप्रसिद्ध चित्र - शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या कलेच्या सन्मानार्थ सुप्रसिद्ध व्हीनस कंपनीने त्यांच्या नावाने नवीन ब्रश मालिका बाजारात विक्रीसाठी आणली आहे. एका चित्रकलेसाठी लागणाऱ्या साहित्याची निर्मिती करणाऱ्या कंपनीने एखाद्या कलाकाराच्या नावाने ही ब्रश मालिका काढणे, ही खरोखरचे त्या कलाकाराच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.

आर्ट पुणे फाउंडेशन आणि व्हीनस ट्रेडर्स यांच्यातर्फे पुण्यात दरवर्षी व्हीनस कला महोत्सव भरविण्यात येतो. यावर्षी या महोत्सवाचे १० वर्ष होते. पुणे येथील घोले पाटील रोडवरील राजा रविवर्मा कला दालनात पार पडलेल्या महोत्सवात या ब्रश मालिकेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमोद कांबळेज् मास्टरस्ट्रोक, आर्टिस्ट प्रमोद कांबळे गोल्डन ज्युबिली कलेक्शन ब्रश या नावाने हे ब्रश बाजारात आणण्यात आले आहे.

व्हीनस ट्रेडर्समध्ये कला विद्यालयाचे विद्यार्थी, एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षार्थी, हौशी आणि व्यावसायिक कलाकार प्रमोद कांबळेjज् मास्टरस्ट्रोक, आर्टिस्ट प्रमोद कांबळे गोल्डन ज्युबिली कलेक्शन ब्रश या नावाने हे ब्रश बाजारात आणण्यात आले आहे. व्हीनस ट्रेडर्स मध्ये कला विद्यालयाचे विद्यार्थी, एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षार्थी, हौशी आणि व्यावसायिक कलाकार जेव्हा चित्रकलेला लागणारे साहित्य खरेदीसाठी येतात, तेव्हा ते आवर्जून प्रमोद कांबळे हे कोणत्या प्रकारचे ब्रश, रंग किंवा साहित्य वापरतात? याची आवर्जून चौकशी करतात आणि तेच साहित्य खरेदी करतात. त्यामुळे आपल्याला त्यांच्याच नावाने ब्रश मालिका विक्रीसाठी आणण्याची कल्पना सुचली. कलाकार या ब्रशचा उपयोग करताना प्रमोद कांबळे यांच्या कलेचे बारकावे, त्यांची शैली, निरीक्षण शक्ती अचूकता, आकर्षक कलात्मकता याचा अभ्यास करतील आणि त्यांच्या कलेपासून कलेसाठी जीव तोडून मेहनत घेण्याची प्रेरणा घेतील, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी बोलतांना व्यक्त केला.
 
प्रमोद कांबळे यांनी व्हीनस कंपनीने आपल्या नावाने ब्रश मालिका काढल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण या गोष्टीचा आनंद व्यक्त करतो. आपल्या कलेचा हा गौरव आहे. माता पिता, गुरु यांचे आशीर्वाद आणि पुण्याई आहे त्यामुळे हे घडले. नवोदित कलाकार आणि व्यावसायिक कलाकारांना यातून निश्चित झोकून देऊन काम करण्याची प्रेरणा मिळेल असे ते म्हणाले.

 

जेष्ठ कला शिक्षक डॉ. सुधाकर चव्हाण यांच्या हस्ते आणि पुणे येथील झपुर्झा संग्रहालयाचे संस्थापक अजित गाडगीळ,. व्हीनस ट्रेडर्सचे संचालक सुरेंद्र करमचंदानी, रावसाहेब गुरव, सुभाष पवार, प्रियंवंदा यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार