सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विशाळगडावर ईद साजरी न करण्याचा निर्णय; ग्रामस्थांनी दर्ग्यासमोरील चौकात एकत्रित येऊन प्रशासनाच्या अन्यायी निर्णयाचा केला निषेध व्यक्त

ट्रस्टचे सदस्य व ग्रामस्थांनी दर्ग्यासमोरील चौकात एकत्रित येऊन प्रशासनाच्या अन्यायी निर्णयाचा निषेध केला व ईद सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला.

Shruti Patil
  • Jun 18 2024 11:58AM

कोल्हापूर: विशाळगडावरील उरूस काळात कुर्बानी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली असतांनाही पोलिस व महसूल प्रशासनाने गडावर येणाऱ्या भाविकांना कुर्बानी करण्यास मनाई केली. यामुळे येथील दर्गा ट्रस्टी व ग्रामस्थांनी आज बकरी ईद सण साजरा न करता गडावरील सर्व व्यवहार बंद ठेवून प्रशासनाचा निषेध केला.

पुरातत्व व वस्तुसंग्रहालय उपसंचालकांनी किल्ले विशाळगडच्या संरक्षित क्षेत्रातील पशुबळी प्रथेवर दीड वर्षांपूर्वी बंदी घातली होती. त्या विरोधात येथील मलिक रेहान दर्गा ट्रस्टींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार बी. पी. कुलाबावाला व न्यायमूर्ती एफ. पी. पुनावाला यांच्या खंडपीठाने १७ ते २१ जून या पाच दिवसांसाठी कुर्बानी करण्यास परवानगी दिली होती. गडावर रविवारपासून ईद व उरुसाची जय्यत तयारी केली होती. मात्र, तहसीलदार रामलिंग चव्हाण, पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पाटील यांनी गडावर कुर्बानी करण्यास जाणाऱ्या भाविकांना पायथ्याशीच अडविले.

दर्गा ट्रस्टी व याचिकाकर्त्यांनी न्यायालयाने कुर्बानीस परवानगी दिल्याचे सांगूनही प्रशासनाने भाविकांना कुर्बानीस विरोध केला. यामुळे ट्रस्टचे सदस्य व ग्रामस्थांनी दर्ग्यासमोरील चौकात एकत्रित येऊन प्रशासनाच्या अन्यायी निर्णयाचा निषेध केला व ईद सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार