सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सिद्धटेक येथे सकल हिंदू समाजाकडून गणपती मंदिराजवळचे अनाधिकृत थडगे जमीनदोस्त

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिराच्या महाप्रवेशद्वाराच्या जवळच अनाधिकृत थडगे बांधण्यात आले होते.

Sudarshan MH
  • Jan 17 2025 12:26PM

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अष्टविनायकपैकी एक तीर्थक्षेत्र असणाऱ्या सिद्धटेक येथे गणपती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अनाधिकृत थडगे उभारण्यात आले होते. काल अहिल्यानगरचे आ. संग्राम जगताप व श्रीराम प्रतिष्ठान या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सागर बेग यांच्या उपस्थितीमध्ये सकल हिंदू संघटनेच्या युवकांनी हे वादग्रस्त थडगे जमीनदोस्त करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. या थडग्याला कोणताही कायद्याचा आधार न घेता काही लोक प्रशासनाला वेठीस धरत होते.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिराच्या महाप्रवेशद्वाराच्या जवळच अनाधिकृत थडगे बांधण्यात आले होते. या बेकायदेशीर थडग्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात आहे. यामुळे ते तात्काळ त्या ठिकाणाहून हटवावे, अशी मागणी सकल हिंदू समाज कर्जत तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांच्याकडे पत्रव्यवहार करून करण्यात आली होती.

मागणी करूनही प्रशासन याबाबत कारवाई करत नसल्यामुळे अखेर काल १६ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता आ. संग्राम जगताप हे सिद्धटेक येथे या वादग्रस्त थडगे असलेल्या ठिकाणी भेट देणार होते. यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार