सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बीड जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती चिंताजनक! एका आठवड्यात तीन महिलांनी जीव गमावला

बीड जिल्हा रुग्णालयात एकाच आठवड्यात तीन मातांचा मृत्यू झाला आहे.

Sudarshan MH
  • Apr 15 2025 11:43AM

बीड: महाराष्ट्राती माता मृत्यूमध्ये वाढ होत आहे. बीड जिल्हा रुग्णालयात एकाच आठवड्यात तीन मातांचा मृत्यू झाला आहे. आज बीडच्या जिल्हा रुग्णालयात एका मातेचा मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयात काय चाललं आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. रुक्‍मीन परशुराम टोने असे मयत मातेचे नाव आहे. १३ एप्रिल रोजी सकाळी रुक्मिणी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे सिजर झाले. या दरम्यान त्यांनी २३०० ग्राम वजनाच्या मुलाला जन्म दिला.

त्यांच्यावर आयसीयु विभागात उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुक्मिणी यांना पूर्वीपासून हृदयाशी संबंधित आजार असल्याचं सांगण्यात आले आहे. तसेच रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना रेफरचा सल्लाही देण्यात आला होता. परंतु ते गेले नाहीत. मात्र सलग दुसऱ्या दिवशी एका मातेचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयात चालले काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

छाया गणेश पांचाळ यांचे एक दिवसापूर्वीच निधन झाले होते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. प्रसुतीसाठी पैशाची मागणी केली २००० रुपये देऊनही प्रसुती योग्यरित्या केली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

जिल्हाशल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचे निलंबन झाल्यानंतर जिल्हा रुग्णातील आरोग्य सेवा सध्या कोलमडली आहे. डॉक्टर संजय राऊत यांच्याकडे जिल्हा शल्य चिकित्सकाचा पदभार आहे. मात्र, आठवडाभरात तीन मातांचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा ही व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसून येते आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार