सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी घेतला वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास

प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते.

Sudarshan MH
  • Dec 26 2024 11:15PM

दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिल्लीमध्ये ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज गुरुवार दि. २६ डिसेंबर रोजी संध्याकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक आल्याची माहिती समोर आली होती. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर एम्स रुग्णालयातील डॉक्टरांची एक खास टीम उपचार करत होती. ते गेल्या अनेक दिवसापासून आजारी असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. १९४७ साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. डॉ. मनमोहन सिंह यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली. सन १९६६ ते १९६९ या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं. नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. १९७२ ते १९७६ या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं. 

१९८२ ते १९८५ या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केलं. त्यानंतर १९८५ ते १९८७ या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं. सन १९९१ सालाच्या आर्थिक संकटकाळी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली. अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करण्यात आलं. भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली. 

सन १९९६ साली मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. २००४ साली यूपीएची सत्ता आल्यानंतर ड. मनमोहन सिंह यांनी देशाचे १३ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. २००४ ते २०१४ या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं. एप्रिल २०२४ साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली. आर्थिक पडझड, आखाती देशांमधील संकट आणि अस्थिर राजकीय परिदृश्य यांच्यामध्ये भारताला १९९१ मध्ये नवीन उदारमतवादी, जागतिकीकरण आणि खाजगीकरणाच्या अर्थव्यवस्थेची ओळख झाली. पी.व्ही. नरसिंहराव सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी १९९१ - ९२ चा केंद्रीय अर्थसंकल्प मांडला होता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार