भांडुप: भांडुप येथील कुख्यात गुंड जिहादी झिया अन्सारी याने स्वतःवर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांची कलमे लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा केला. काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला हाेता. त्याच्यावर आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दोन दिवसापूर्वीच त्याचा वाढदिवस होता. त्याने अनोखा केक बनवून पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याच्यावर विविध गुन्ह्यात लागलेल्या कलमांसह पुढील गुन्हा आता काय करणार? अनेकांनी रिल्स आणि सोशल मीडियावर या वाढदिवसाचे फोटो व्हायरल केले आहेत. त्यानंतर, या गुन्हेगारी वाढदिवसांची गंभीर नोंद पोलिसांनी घेतली असून आरोपीला तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.