सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नागपूरमध्ये ५८० शिक्षकांना पैसे घेऊन नोकरीला लावण्याचा धक्कादायक प्रकार, मृत शिक्षकाच्या नावावरही पैसे लाटले; मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिक्षक भरती घोटाळ्याची दखल

नागपूरमध्ये ५८० शिक्षकांना पैसे घेऊन नोकरीला लावण्याचा आल्याचा प्रकार उघड झाला आहे. प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी २० ते ३५ लाख रुपये घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

Sudarshan MH
  • Apr 15 2025 11:57AM

नागपूर: नागपूर शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणात प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे समजते. त्यामुळे ५८०  अपात्र शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता आहे. बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करुन सरकराला कोट्यवधीची चुना लावण्यात आला होता.

नागपूर विभागात झालेल्या ५८० शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरु आहे. प्रत्येक बोगस नियुक्तीसाठी २० ते ३५ लाख रुपये घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून भरती झालेल्या बोगस शिक्षकांच्या बँक खात्यात किती पगार जमा झाला, याची तपासणीही केली जाणार आहे. सोमेश्वर नैताम नावाचे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळांचे शिक्षणाधिकारी हे २०१६ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागातील भ्रष्ट मंडळींनी हयात नसलेल्या सोमेश्वर नैताम यांच्या बोगस स्वाक्षरीचा वापर करून २०१६ ते २०२४ दरम्यान १०० पेक्षा जास्त शिक्षकांची बोगस नियुक्ती केल्याचा आरोप आता होत आहे.

विशेष म्हणजे सोमेश्वर नैताम हयात नसतांना त्यांची बोगस स्वाक्षरी वापरून शिक्षकांची नियुक्ती बॅक डेट मध्ये म्हणजेच २०१६ च्या आधीच्या कालावधीत दाखवण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांची बोगस नियुक्ती हयात नसलेल्या अधिकाऱ्याची बोगस स्वाक्षरी करून करण्यात आल्याचे गंभीर प्रकार नागपुरात घडल्याचे आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार