सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बांगलादेशी अल्पवयीन मुलीला तिच्या मैत्रिणीनेचं पुण्यातील वेश्यालयात ३ लाखांना विकले!

पुण्यातील बुधवार पेठ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांगलादेशी अल्पवयीन मुलीची फसवणूक करत तिला तिच्याच मैत्रिणीने विकलं आहे.

Sudarshan MH
  • Apr 15 2025 12:50PM

पुणे: पुणे शहरातील बुधवार पेठ ही रेड लाईट एरिया म्हणून ओळखली जाते आणि अलीकडील काळात येथे बांगलादेशी महिलांची संख्या वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर, पुण्यात घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यात एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीला फसवून बुधवार पेठेतील वेश्या व्यवसायात विकण्यात आले आहे. या घटनेतून पुन्हा एकदा या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले जात आहे. बुधवार पेठेतून ती थेट पोलिस स्टेशनला गेली, अल्पवयीन मुलीने सांगितलेल्या गोष्टीने पोलिसांना देखील धक्का बसला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीच्या सोबत पुण्यात आली होती. मैत्रिणीने नोकरी आणि फिरण्याचे आमिष दाखवून तिला फसवून घात केला. बांगलादेशातून नदीमार्गे बेकायदेशीरपणे तिला भारतात आणलं गेलं. सुरुवातीला त्या दोघी भोसरी भागात काही दिवसांसाठी राहिल्या. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने तिला बुधवार पेठ परिसरातील एका कोठेवालीकडे ३ लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार तिला समजला तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली.

तिला विकल्यानंतर संबंधित महिलेनं पीडित मुलीला धमकी दिली की, “तू बांगलादेशी आहेस, तुझ्यावर पोलिस कारवाई करतील.” या भीतीपोटी तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं, तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. तेथे संबंधित महिलेनं पीडित मुलीला धमकी दिली की, तू बांगलादेशी आहेस, तुझ्यावर पोलिस कारवाई करतील. या भीतीपोटी तिला एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं आणि वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं गेलं.

पाच महिने अत्याचार सहन केले, त्यानंतर तिने योग्य संधी आणि वेळ मिळताच 7 एप्रिल रोजी तिथून पळ काढला. बस आणि रिक्षामार्गे ती हडपसरपर्यंत पोहोचली आणि तेथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हडपसर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत ते फरासखाना पोलिसांकडे प्रकरण वर्ग केलं. या प्रकरणी पोलिसांनी पाच महिलांवर गुन्हा दाखल केला असून, एका महिलेला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे करत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार