सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पूजा खेडकरला बनावट प्रमाणपत्र दिलेल्या अहिल्यानगरच्या रुग्णालयातील दोन कर्मचार्‍यांसह चार जणांवर गुन्हा दाखल

जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, पाथर्डी तालुक्यातील चौघांवर तर दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sudarshan MH
  • Sep 10 2024 1:56PM

अहिल्यानगर: पूजा खेडकरला दिव्यंगत्वाची खोटी प्रमाणपत्रे देणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात अशी खोटी प्रमाणपत्रे देणारे रॅकेट चालत असल्याचं समोर आलं आहे. अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाकडून याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापैकी दोन जण रुग्णालयात काम करणारे कर्मचारी आहेत, तर चौघांनी अपंगांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी खोटी प्रमाणपत्रे बनवल्याच समोर आलं आहे. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा रुग्णालयातील अज्ञात कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता, रुग्णालयात नोंद न करता ऑनलाईन पोर्टलवार माहिती भरली. त्याद्वारे कर्णबधीर असल्याचे बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या चौकशीतून समोर आला आहे.

याप्रकरणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, पाथर्डी तालुक्यातील चौघांवर तर दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी (वर्ग एक) डॉ. साहेबराव डवरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे या बनवेगिरीच्या साखळीमध्ये जिल्हा सरकारी रुग्णालयातीलच काही कर्मचारी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रसाद संजय बडे (पाथर्डी), सुदर्शन शंकर बडे (पाथर्डी), सागर भानुदास केकाण (रा. पागोरी पिंपळगाव, पाथर्डी), गणेश रघुनाथ पाखरे (माणिकदौंडी, पाथर्डी) योगेश बनकर (जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी) गणेश गोत्राळ (जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार