जळगाव: महाराष्ट्रातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी दि. ७ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर पर्यंत भव्य शिव प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून सर्व घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी जनता एन. आर. सी. चळवळीची शिव प्रेरणा यात्रा सुरू झाली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एक कोटी घुसखोरांवर कारवाईची मागणी केली जाणार आहे. महाराष्ट्र घुसखोर मुक्त झाला, तर राज्य सुरक्षित, स्थिर आणि संपन्न होईल. आज दि. ८ नोव्हेंबर रोजी जळगाव येथे देशहितासाठी, राष्ट्रीय सुरक्षेतेसाठी मतदान जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.
यावेळी बोलतांना ते म्हणाले, की देशहितासाठी, राष्ट्रीय सुरक्षेसाठी १०० टक्के मतदान करा. जाती - जातीत, भाषा, प्रांत यांत विभागले जाऊ नका. हिंदू म्हणून एक या. मी कोणत्याही पक्षाला मतदान करा असे सांगत नाही, फक्त हिंदू म्हणून मतदान करा. निवडणुकीसाठी मत मागायला आलेल्या उमेदवाराला धर्मांतर बंदी, लव्ह जिहाद, भूमी जिहाद, गो - हत्या बंदी यावर विधानसभेत हिंदूंचे प्रश्न मांडण्यास सांगा. तसेच व्होट जिहाद संदर्भात उपस्थित हिंदूंच्या सोबत शपथ घेण्यात आली.
जनता NRC ची मोहीम कशी राबवली जाणार?
प्रथम क्षेत्र निश्चित केले जाणार. त्यानंतर कार्यकर्त्यांचा संघ आणि वर्गवारी केली जाणार. त्यानंतर घुसखोरांनी स्वत: पुढे यावे, यासाठी आवाहन केले जाणार. त्यानंतर शोधमोहीम राबवली जाईल. शोध लागलेली व्यक्ती घुसखोरच आहे ना? याची खात्री केली जाईल आणि त्यानंतर त्यांना देशाबाहेर घालण्यासाठी सरकारवर दबाव आणला जाईल. अशी ६ टप्प्यांमध्ये मोहीम राबवली जाईल.
तीन - चरण ब्लूप्रिंट...
पहिला टप्पा - जनजागृती...
या मोहिमेबाबत लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी संवाद साधणे, कार्यशाळा आयोजित करणे आणि स्थानिक समुदायांपर्यंत माहिती पोहोचवणे महत्त्वाचे आहे.
दुसरा टप्पा - कार्यकर्त्यांची टीम तयार करणे...
सक्षम कार्यकर्त्यांची एक मजबूत टीम तयार करावी लागेल, जी जनजागृतीसाठी मदत करेल आणि या समस्येवर काम करणाऱ्या संस्थांना सहकार्य करेल.
तिसरी पायरी - सरकारवर दबाव आणणे...
शोध आणि शोध घेण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करून अहवाल प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. हे समस्येचे योग्य निराकरण करण्यात मदत करेल.
‘www.JananNRC.org’ या संकेतस्थळावर या अभियानाची माहिती देण्यात आली आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी आणि पाठींबा देण्यासाठी ९२०९४२०४२०४ या क्रमांकावर संपर्क करा.