सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

आळंदीतून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाचे पंढरीकडे प्रस्थान

आळंदीत वेगवेगळया खेड्यांतून आलेले हजारो वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथासोबत पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहे.

Shruti Patil
  • Jun 30 2024 9:17AM

पुणे: पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सणच असतो. पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती. आज ३० जून रोजी आळंदीमधून संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथाचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. आळंदीतील संपूर्ण वातावरण भक्तीमय असे झाले आहे. पावसाच्या सरी पडत आहे, तरी वारकरी 'माऊली - माऊली' करत आनंदाने, उत्साहाने पुढे चालत आहे.

वारकऱ्यांसाठी जागोजागी पिण्याचे पाण्याची, खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था वारकऱ्यांचे हाल होऊ नये म्हणून रक्ताच्या दोन्ही बाजूने तत्पर आहे. वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. वारीत कोणत्याही वारकऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची प्रशासनाने पूर्णपणे काळजी घेतलेली आहे.

आषाढाची चाहूल लागताच मनाला पंढरीच्या वारीची ओढ लागते. हरिमय झालेले असंख्य वारकरी, कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार