सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालकांच्या वतीने ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’ श्रीक्षेत्र आळंदीत

राज्यात शेती आणि आरोग्य यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या गोवंशियांच्या रक्षणासाठी महाराष्ट्र शास‌नाने अनुदान द्यावे, ही या उपोषणाची प्रमुख मागणी आहे.

Sudarshan News
  • Sep 20 2024 8:05AM

आळंदी: सध्या देशी गोवंशियांची कत्तली मोठ्या प्रमाणात चालू आहे. गोशाळांच्या आर्थिक समस्या पुष्कळ आहेत. श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने देशी गोवंशियांच्या रक्षणासाठी उपोषण करणार असून या आंदोलनाला ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’, असे नाव देण्यात आले आहे. राज्यात शेती आणि आरोग्य यांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या गोवंशियांच्या रक्षणासाठी महाराष्ट्र शास‌नाने अनुदान द्यावे, ही या उपोषणाची प्रमुख मागणी आहे.

गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि राजस्थान या ४ राज्यांमध्ये देशी गोवंशियांच्या पालनासाठी अनुदान देण्यात येते. महाराष्ट्र या राज्यांपेक्षा प्रगत राज्य आहे. तरीही राज्यात देशी गोवंशियाला अनुदान देण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे आमरण उपोषण करण्याचा निर्णय नाईलाजाने घेण्यात आला आहे. राजकीय दृष्टीकोनातून आम्ही महायुतीचेच समर्थक आहोत; परंतु गोमातेच्या आस्थेपोटी शासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्यासाठी अन्य कोणताही पर्याय नसल्याने उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ‘अखिल भारत कृषी गोसेवा संघा’चे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी सांगितले.

आळंदी येथील गोपाळपुरामधील मारुति मंदिर संस्थान येथे अखिल भारत कृषी गोसेवा संघ, पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार