सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा घडनेला जबाबदार बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा

सरकारी स्तरावर उभ्या राहणाऱ्या पुतळ्यांची तपासणी करून राज्य कला संचानलयाची अंतिम मान्यता घ्यावी लागते, मात्र मालवण येथील धातूच्या पुतळ्याला संचालनालयाची अंतिम मान्यता नसल्याची बाब समोर आली आहे.

Sudarshan MH
  • Aug 29 2024 8:06PM

चाळीसगाव (दि. २९): राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळणे ही घटना महाराष्ट्राचा अवमान करणारी आहे, यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत, छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचे दैवत आहेत, आमच्या दैवताचा अवमान कदापी सहन केला जाणार नाही म्हणून जयदीप आपटे व चेतन पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करून बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा घेण्याची मागणी राज्यपाल यांना चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्फत सकल मराठा समाज व शिवप्रेमी संघटनांच्या वतीने दि. २९ ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे,

 
स्वराज्याची निर्मिती करताना छत्रपती शिवाजी महाराजांची दृष्टी व्यापक राष्ट्रीयत्वाची होती अठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले म्हणूनच महाराज मराठी माणसाच्या नव्हे तर अवघ्या भारतभूमीचा अभिमान आहेत केवळ राजकीय पोळ्या शेकता याव्यात म्हणून त्यांचे पुतळे उभारण्याची मानसिकता असेल तर शिवप्रेमी अशांना त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाहीत, राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळणे ही घटना महाराष्ट्राचा अवमान करणारी आहे, छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचे दैवत आहेत, आणि आमच्या दैवताचा अवमान कदापी सहन केला जाणार नाही. शिवरायांच्या पुतळा उभारण्याचे काम तज्ञ अनुभवी शिल्पकाराला न देता नवख्या अनुभव नसलेल्या जयदीप आपटे सारख्या कपट कारस्थान करणाऱ्याना शिल्पकाराला देण्यात आले.
 
आपटे शिल्पकाराने शिवरायांच्या कपाळावर कृष्णा भास्कर कुळकर्णी यांनी केलेल्या तलवार हल्ल्यात जखम पडली होती, तशीच जखम शिवरायांच्या कपाळावर दाखवून पुतळा साकारण्यात आला आहे. म्हणजेच जयदीप आपटे यांचा पुतळा बनविताना शुद्ध हेतू नव्हता, अश्या नवख्या शिल्पकाराला पुतळ्याचे कामकाज सोपविण्यात आले, या दुर्घटनेला राज्य सरकार जबाबदार असताना पुतळा कोसळल्यानंतर नौदलावर पुतळा पडल्याची जबाबदारी टाकून शासनाने जबाबदारी झटकून महाराष्ट्राचा अक्षम अपराध केला आहे.
 
सरकारी स्तरावर उभ्या राहणाऱ्या पुतळ्यांची तपासणी करून राज्य कला संचानलयाची अंतिम मान्यता घ्यावी लागते, मात्र मालवण येथील धातूच्या पुतळ्याला संचालनालयाची अंतिम मान्यता नसल्याची बाब समोर आली आहे. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाते आणि चालविले जाते. पण घाईघाईने पुतळ्याचे काम निवडणूका डोळ्यासमोर ठेवून शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा राजीनामा घ्यावा, तसेच पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या जयदीप आपटे, चेतन पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेचा सकल मराठा समाज व शिवप्रेमींच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत.
- सुनील पाटील...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार