सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यातील २८ वर्षीय गर्भवतीला झिकाची लागण; पुण्यात पाच रूग्ण

पुण्यात झिकाच्या रूग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.

Shruti Patil
  • Jul 1 2024 9:33AM

पुणे: पुण्यामध्ये मागील आठवड्याभरापासून झिकाच्या रूग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. पुण्यात झिकाचा पाचवा रूग्ण आढळला असून २८ वर्षीय गर्भवती महिलेला झिकाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडवणे येथील तीन गरोदर महिलांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोन निगेटिव्ह आले आहेत. यातील एका महिलेला झिकाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

झिकाची लागण झालेली गर्भवती महिला बाधित रुग्णाच्या घराजवळ राहत होती. ही माहिती समोर आल्यानंतर आणखी तीन नमुने पाठवण्यात आले असून निकालाची प्रतीक्षा आहे. यासाठी आरोग्य विभागाकडून अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. घरातील एअर कंडीशनर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी बराच काळ पाणी साचून राहू नये, यासाठी प्रतिबंधक उपाययोजना घेण्याची सूचना करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहिमेला गती देण्यात येत आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नाहीत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार