माओवाद्यांचा कट उधळला: गडचिरोली पोलिसांनी पर्लकोटा नदीवरील IED निष्क्रिय केली
गडचिरोली जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी भामरागड आणि ताडगावला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलावर स्फोटके (IED) पेरून मोठा घातपात घडविण्याचा कट रचल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कारवाई करण्यात आली. गडचिरोलीहून बीडीडीएस (BDDS) टीम हेलिकॉप्टरद्वारे घटनास्थळी पाठविण्यात आली.

गडचिरोली पोलीस, सीआरपीएफ, आणि बीएसएफच्या संयुक्त पथकाने परिसरात शोध मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान, पथकाला पर्लकोटा नदीवरील पुलावर दोन स्फोटके (IED) आढळून आली. स्फोटके निष्क्रिय करण्यासाठी बीडीडीएस पथक कार्यरत असताना, एका IED चा अचानक स्फोट झाला. सुदैवाने, या स्फोटात सुरक्षा दलातील कोणालाही दुखापत झाली नाही. दुसरे स्फोटक पथकाने नियंत्रित स्फोटाद्वारे यशस्वीपणे नष्ट केले.
सदर घटनेनंतर पोलिसांनी परिसरात शोध मोहीम तीव्र केली आहे. या सतर्क कारवाईमुळे माओवाद्यांचा विधानसभा निवडणूक बिघडविण्याचा कट हाणून पाडण्यात आला आहे. गडचिरोली पोलिसांची सतर्कता आणि तात्काळ कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून, निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे.
गडचिरोली पोलिसांचे माओवाद्यांना कडक प्रत्युत्तर:
या घटनेमुळे पोलिस दलाचे मनोबल उंचावले असून, जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहन गडचिरोली पोलिसांनी केले आहे.
मुकेश कावळे गडचिरोली
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प