सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

छ. संभाजीनगरात पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा धक्कादायक प्रकार आला उघडकीस

धम्मानंद इंगळे यांच्याकडे उत्तेजक द्रव्य आणि गोळ्या सापडल्या आहेत. त्याला उत्तेजक द्रव्य आणि औषधी गोळ्यांसह शहरातील सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Shruti Patil
  • Jul 1 2024 9:43AM

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारत राखीव बटालियनच्या पोलीस भरतीसाठी आलेल्या एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्य आणि गोळ्या सापडल्या आहेत. २९ जून रोजी सकाळी मैदानी चाचणी पूर्वी तपासणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे.

सदरील तरुणाला उत्तेजक द्रव्य आणि औषधी गोळ्यांसह शहरातील सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. धम्मानंद प्रकाश इंगळे असं या तरुणाचं नाव असून, तो बोरगाव वसू, ता. चिखली, जि. बुलडाणा येथील रहिवासी आहे.

शहरातील सातारा परिसरातील भारत राज्य राखीव बटालियन येथील रिक्त पोलीस शिपायांच्या पदांसाठी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. मैदानी आणि शारिरीक चाचणीसाठी अर्जदार उमेदवारांना बोलावण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील उमेदवार धम्मानंद इंगळे याच्यासह अन्य उमेदवारांची काल २९ जून रोजी मैदानी आणि शारिरीक चाचणी होती. या उमेदवारांना मैदानावर सोडण्यापूर्वी त्यांची तपासणी करण्यात येते. त्यावेळी ही बाब लक्षात आली.

धम्मानंद इंगळे यांच्याकडे उत्तेजक द्रव्य आणि गोळ्या सापडल्या आहेत. त्याला उत्तेजक द्रव्य आणि औषधी गोळ्यांसह शहरातील सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार