छत्रपती संभाजीनगर: सिल्लोड विधानसभा क्षेत्रातील एका ठिकाणी व्याख्यानात बांगलादेशी हिंदूंवर तेथील मुस्लिमांकडून कशाप्रकारे अत्याचार केले जातात? याविषयी वक्ते माहिती देत होते. यावेळी एका अन्य धर्मीय महिलेने याला आक्षेप घेतल्यामुळे उपस्थित हिंदू महिलांनी अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या साड्यांची रस्त्यावर येऊन होळी केली.
जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे ५ ऑक्टोबर या दिवशी ही घटना घडली आहे. सिल्लोड येथील कार्यक्रमात बांगलादेशी हिंदूंवरील मुस्लिमांच्या अत्याचारांविषयी माहिती दिली जात असतांना एका धर्मांध महिलेने ‘आमच्या समाजाची अपकीर्ती थांबवा’, असे सांगत ही माहिती सांगण्याला विरोध केला. तेव्हा उपस्थित हिंदू महिलांनी तिला असे करण्यापासून रोखल्यावर तिने ‘अब्दुल सत्तार यांच्या साड्या तुम्हाला कशा चालतात?’, असा प्रश्न विचारला तेव्हा उपस्थित हिंदू महिलांनी धर्माभिमान दाखवत कार्यक्रमातून बाहेर येऊन रस्त्यावरच साड्यांना आग लावून त्यांची होळी केली.