कोल्हापूर: राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात "तंबाखू व्यसनमुक्ती विभागाची सुरवात करण्यात आली असून या तंबाखू व्यसनमुक्ती मोहिमेच उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री यांच्या हस्ते मंगळवारी ऑनलाईन पद्धतीने झाले.
सीपीआर मध्ये सुरू झालेल्या या विभागांतर्गत तंबाखू व्यसनमुक्ती साठी समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या महाविद्यालयाच्या अंतर्गत मनोविकृतीशास्त्र विभाग हा विभागही सुरू करण्यात आला आहे.