नाशिक: नाशिक येथील त्र्यंबकेश्वरमधून १० मुस्लिम तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ब्रह्मगिरी पर्वत परिसरात भ्रमणभाषद्वारे हे तरुण परिसराचे चित्रीकरण करत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने स्थानिक नागरिकांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा मुस्लिमांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली; म्हणून नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली.
तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. हे तरुण केरळमधील असल्याचे समजते. त्यांना चौकशीसाठी त्र्यंबकेश्वरच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. त्यांच्याकडील कागदपत्रे आणि भ्रमणभाषमध्ये काढलेली छायाचित्रे यांची पडताळणी केली जात आहे.