सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या 'महाराज' चित्रपटाच्या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी; विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने दाखल केली होती याचिका

या चित्रपटाचे पोस्टर पाहून महाराजांनी हिंदू धर्मगुरूंना खलनायकांच्या भूमिकेत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे केला आहे.

Shruti Patil
  • Jun 13 2024 9:24AM
मुंबई: बॉलीवूडमधील चित्रपट निर्माते सातत्याने हिंदूविरोधी चित्रपट बनवत आहेत. यशराज फिल्म्स आणि आप निर्मित 'महाराज' हा चित्रपट आमिर खानचा मुलगा जुनेद खान याने दिग्दर्शित केला आहे, पण या चित्रपटाचे पोस्टर पाहून महाराजांनी हिंदू धर्मगुरूंना खलनायकांच्या भूमिकेत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे केला आहे.
 
महाराज या वादग्रस्त चित्रपटाबाबत मुंबईत विश्व हिंदू परिषद आणि बंजरग दलाने निषेध व्यक्त केला होता. तसेच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने या चित्रपटाच्या निर्मात्याला व नेटफ्लिक्स यांना नोटीस पाठवण्यात आली होती, की जर हा चित्रपट १४ जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करणार असेल, तर त्यापूर्वी तो चित्रपट दाखवावा. जेणेकरून चित्रपटात काही आक्षेपार्ह गोष्टी तर नाही? याची खात्री करून घेता येईल. परंतु याबाबत सिद्धार्थ पी मल्होत्रा आणि नेटफ्लिक्सकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
 
त्यामुळं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने या चित्रपटाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी २ वाजता न्यायालयात सुनावणी होणार आहे. आता महाराज या वादग्रस्त चित्रपटाबाबत न्यायालय काय निर्णय घेते? याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार