सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बीड पुन्हा हादरलं! कोयत्याने सपासप वार करत ग्रामपंचायत सदस्याला संपवलं!

हत्या करणारा आरोपी नारायण शंकर फफाळ हा स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला असून आर्थिक देवाण - घेवाणीच्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Sudarshan MH
  • Apr 16 2025 11:22AM
बीड: बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद आजही महाराष्ट्रात उमटत असतांनाही बीडमध्ये गुन्हेगारीचं सत्र सुरुचं आहे. बीडच्या माजलगाव शहरात भरदिवसा एका तरुणाची धारधार कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाबासाहेब आगे असं मृत तरुणाचे नाव आहे. हत्या करणारा आरोपी नारायण शंकर फफाळ हा स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला असून आर्थिक देवाण - घेवाणीच्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
 
माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य असलेले बाबासाहेब आगे हे भाजपच्या तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळ भाजप कार्यालय येथे आले होते. त्या कार्यालयाच्या समोरच त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आणि यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
 
आरोपी नारायण शंकर फफाळ याने कोयता शर्टच्या पाठीमागे लपवून आणला होता. त्यानंतर सपासप वार करून त्याने भरदिवसा या तरुणाची हत्या केली. स्वत: आरोपी नारायण शंकर फफाळ हा माजलगाव शहर पोलिस ठाण्यामध्ये हजर होऊन त्याने हत्येची कबुली दिली आहे.
 
माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळ भर वस्तीत घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. नराधमांना कायदाचा धाक उरलेला आहे की नाही? असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार