सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे

Donation

बंगालमध्ये वक्फ कायद्याच्या नावाखाली हिंदूंवर होणारी जिहादी आक्रमणे थांबवा; विश्व हिंदू परिषदेचे आवाहन

विश्व हिंदू परिषदेच्या सिलिगुडी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलतांना राष्ट्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी आवाहन केले आहे.

Sudarshan MH
  • Apr 16 2025 11:25AM
सिलिगुडी (बंगाल): विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी बंगालमध्ये शांतता, सुव्यवस्था आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याचे, तसेच वक्फ कायद्याच्या निषेधाच्या नावाखाली हिंदूंवर होणारी जिहादी आक्रमण तातडीने थांबवण्याचे आवाहन केले. पोयला वैशाख आणि शुभो नववर्ष १४३२ बंगाबदनिमित्त सिलिगुडी महानगरातील नागरिक आणि बंगालमधील सर्व जनता यांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी हे आवाहन केले आहे.
 
विश्व हिंदू परिषदेच्या सिलिगुडी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलतांना मिलिंद परांडे म्हणाले, की बंगालमध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा आणि हिंदूंच्या रक्षणासाठी केंद्रीय सुरक्षादलांना तात्काळ तैनात करावे. तसेच बंगालचे मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी यांचे प्रक्षोभक विधान निषेधार्ह आहे. मुर्शिदाबादमध्ये हिंदूंवर झालेल्या जिहादी आक्रमणात मृत्यूमुखी पडलेल्या हरगोविंद दास आणि चंदन दास यांच्या कुटुंबियांना योग्य भरपाई देण्यात यावी, तसेच, दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी.
 
पुढे ते म्हणाले, की स्वतःच्या राज्यात निर्वासित होण्यास भाग पाडलेल्या आणि मुर्शिदाबादहून मालदा येथे आश्रय घेतलेल्या बंगाली हिंदूंचे त्वरित पुनर्वसन करावे. बंगालमधील ही घटना काश्मीरमध्ये घडलेल्या घटनांची अचूक पुनरावृत्ती आहे. तसेच, बंगालचे राज्यमंत्री फिरहाद हकीम यांनी हिंदूंना त्यांच्याच राज्यात निर्वासित होण्याविषयी केलेले विधान अत्यंत लज्जास्पद आणि निंदनीय आहे. राज्य सरकारने सिलिगुडीमध्ये आणि बंगालमधील इतर ठिकाणी वक्फ कायद्याच्या निषेधाच्या नावाखाली कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घ्यावी.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार