सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मारेगाव तालुक्यातील भूरकी पोड येथील नागरिकांची पाण्यासाठी पंचायत समितीवर धडक

यवतमाळ जिल्ह्यात जलजीवन मिशनचा बोजवारा. जल जीवन मिशनचे काम अधुरे, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे वणवण...

Sudarshan MH
  • Sep 28 2024 9:30AM
मारेगाव: मारेगाव तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांनाही अपेक्षित वेग मिळत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. यामुळे आजारी पडलेल्या वृद्ध, गर्भवती महिला व लहान मुलांना सर्वाधिक त्रास होत आहे.
 
या पार्श्वभूमीवर, भुरकी पोडकरांनी आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी मारेगाव पंचायत समितीकडे धाव घेतली असून मोठ्या संख्येने पुरुष व महिला पंचायत समितीसमोर जमले होते. त्यांनी या समस्यांबाबत गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला त्वरित उपाययोजना करून, पाणीपुरवठा दुरुस्त करण्याचे निर्देश दिले.
 
भुरकी पोडकरांनी केलेल्या या धडकेमुळे पाणीपुरवठा समस्या लवकरच सुटण्याची अपेक्षा आहे. मात्र, नागरिकांनी मागणी केली आहे की, या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात.
 
- किरण मुक्कावार (यवतमाळ)...

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार