भारतातील सिमेंट उद्योगात अल्ट्राटेक सिमेंटचे नाव आघाडीवर आहे. आता ही कंपनी जगातील तिसरी सर्वात मोठी सिमेंट कंपनी बनली आहे. कंपनीने केसोराम उद्योगाचा सिमेंट व्यवसाय विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. कुमार मंगलम बिर्ला यांच्या कंपनीने ही कंपनी ७६०० कोटी रुपयांमध्ये हा सौदा केला आहे. या करारामुळे कुमार मंगलम बिर्ला आता अदानीच्या सिमेंट व्यवसायाला तगडी स्पर्धा देणार आहेत.
एव्ही बिर्ला ग्रुपची सिमेंट कंपनी अल्ट्राटेक सिमेंट, बीके बिर्ला ग्रुपच्या केसोराम इंडस्ट्रीजचा सिमेंट व्यवसाय शेअर स्वॅप डीलमध्ये विकत घेईल. केसोराम इंडस्ट्रीजचे एकूण मूल्यांकन कर्जासह, सुमारे ७६०० कोटी रुपये आहे. केसोराम यांनी शेअर बाजाराला सांगितले की, त्यांच्या संचालक मंडळाने शेअर स्वॅपद्वारे सिमेंट व्यवसाय विक्रीला मंजुरी दिली आहे. केसोरामच्या ५२ शेअर्ससाठी अल्ट्राटेक सिमेंटचा एक शेअर त्यांच्या शेअर धारकांना मिळेल.