मारेगाव: मारेगाव तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांनाही अपेक्षित वेग मिळत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. यामुळे आजारी पडलेल्या वृद्ध, गर्भवती महिला व लहान मुलांना सर्वाधिक त्रास होत आहे.
या पार्श्वभूमीवर, भुरकी पोडकरांनी आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी मारेगाव पंचायत समितीकडे धाव घेतली असून मोठ्या संख्येने पुरुष व महिला पंचायत समितीसमोर जमले होते. त्यांनी या समस्यांबाबत गटविकास अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला त्वरित उपाययोजना करून, पाणीपुरवठा दुरुस्त करण्याचे निर्देश दिले.
भुरकी पोडकरांनी केलेल्या या धडकेमुळे पाणीपुरवठा समस्या लवकरच सुटण्याची अपेक्षा आहे. मात्र, नागरिकांनी मागणी केली आहे की, या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात.
- किरण मुक्कावार (यवतमाळ)...