सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास पोलिसांकडून दहा लाखांचं बक्षीस जाहीर; माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन संशयित आरोपींचं स्केच पोलिसांना जारी केले आहेत.

Sudarshan MH
  • Oct 7 2024 10:08AM

पुणे: पुण्यातील बोपदेव घाटात मित्रासोबत गेलेल्या तरुणीवर ३ ऑक्टोबर रोजी रात्री ११ - १२ वाजेच्या सुमारास सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेला तीन दिवस उलटून गेले तरी अद्याप आरोपी सापडू शकलेले नाही आहे. पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. याशिवाय माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचं पोलिसांनी जाहीर केलं आहे.

गेल्या १५ दिवसांत बोपदेव घाटमार्गातून गेलेल्या तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात आली आहे. त्यानुसार तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बोपदेव घाटातून सासवडकडे गेल्याचा संशय आहे. घाटापासून ७० ते ८० किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही तपासले जात आहेत. मात्र अद्याप तरी आरोपींपर्यंत पोलीस अजूनही पोहोचू शकलेले नाहीत. बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोन संशयित आरोपींचं स्केच पोलिसांना जारी केले आहेत. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे विविध पथक आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच जवळचे सर्व सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासण्यात येत आहेत. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार