मुंबई: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांकडून झालेल्या अवमानकारक विधानांच्या निषेधार्थ काँग्रेस नेत्यांनी काल, गुरुवारी (19 सप्टेंबर) राज्यभरात रस्त्यावर उतरून आंदोलन केले
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा येथीस घरासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी पोलिसांकडून काँग्रेसच्या आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली.