सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संगमनेरमधील लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य आरोपी जिहादी युसुफ चौघुले शरद पवार गटाचा पदाधिकारी असल्याने त्याला सोडविण्यासाठी निलेश लंकेंचा पोलिसांवर दबाव

या लव्ह जिहाद प्रकरणातील जिहादी आरोपी युसफ चौघुलेला सोडण्यासाठी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी पोलिसांवर दबाव टाकला असल्याचे समोर आले आहे.

Sudarshan MH
  • Jul 29 2024 8:25PM

संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठार भागात घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील म्होरक्या सह चौघांवर घारगाव पोलिसांनी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करत गजाआड केले आहे. परंतु या लव्ह जिहाद प्रकरणातील जिहादी आरोपी युसफ चौघुलेला सोडण्यासाठी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी पोलिसांवर दबाव टाकला असल्याचे समोर आले आहे. याचे कारण असे सांगितले जात आहे, की या लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा पदाधिकारी आहे. त्यामुळे आरोपीला सोडवण्यासाठी निलेश लंके यांनी पोलिसांवर दबाव आणला आहे.

तब्बल पाच वर्षांपासून पीडित तरुणीला प्रेमाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले आणि त्यानंतर फूस लावून वेगवेगळ्या ठिकाणी नेत बळजबरीने लग्न आणि धर्मांतर करुन अत्याचार केल्याचे जबाबातून समोर आले आहे. याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की पीडित तरुणी अल्पवयीन असल्याचे माहीत असतांनाही मुख्य आरोपी जिहादी शादाब तांबोळी याने सन २०२० पासून यूसुफ चौघुले, कुणाल शिरोळे यांच्या मदतीने वेळोवेळी पाठलाग करुन प्रेमाचे आमिष दाखवत सलगी केली. याचा फायदा उठवून तांबोळी व चौघुले या दोघांनी पीडित तरुणीला फसवून पुण्यातील मंचर येथे बोलावले. त्यानंतर चौघुले याच्या कारमधून मंचरवरुन लग्नासाठी चाकण येथे नेले. यासाठी तिला पाण्यातून काहीतरी गुंगीचे औषध देत बेशुद्ध केले. यावरच त्यांचा कारनामा थांबला नाही. त्यांनी तेथून पुन्हा दुसर्‍या वाहनाने मुंबईला पाठवून दिले.

मुंबईत आल्यावर येथील अयाज पठाण याने सतत धमकावून तांबोळी आणि पीडित तरुणीला लॉजवर पाठवून दिले. तेथे तांबोळी हा तिला फोटो व्हायरल करेल आणि तुझ्या घरच्यांना संपवून टाकेल अशी धमकी देऊन अत्याचार केले. विशेष म्हणजे तिला न सांगता बळजबरीने लग्नाच्या व धर्मांतराच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्याचे पीडितेने जबाबात सांगितले. यावरुन घारगाव पोलिसांनी मुख्य आरेापी शादाब तांबोळी, सूत्रधार यूसुफ चौघुले, कुणाल शिरोळे व अयाज पठाण यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर हे करत आहे.

दरम्यान, यातील म्होरक्या यूसुफ चौघुले याचा पोलीस कसून शोध घेत होते. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने श्रीरामपूर येथून अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तत्पूर्वी लव्ह जिहादचा हा प्रकार असल्याने बजरंग दलाने घारगाव येथे जनआक्रोश मोर्चा काढला होता. त्यामुळे पोलिसांनी प्रकरणाच्या मुळाशी जात आरोपींवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार