सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मिरे एसेट फाइनेंशियल सर्विसेसने नोकरदारांसाठी केली वैयक्तिक कर्जाची सुविधा सुरू

एनबीएफसी शाखेतून ९ जुलै पासून नोकरदार वर्गासाठी वैयक्तिक कर्जाची म्हणजेच पर्सनल लोनची सुरुवात केली आहे.

Sudarshan MH
  • Oct 31 2024 7:45PM
मुंबई: भारतातील निवडक शहरांमध्ये मिरे समूहाची मिरे एसेट फाइनेंशियल सर्विसेसने आपल्या एनबीएफसी शाखेतून ९ जुलै पासून नोकरदार वर्गासाठी वैयक्तिक कर्जाची म्हणजेच पर्सनल लोनची सुरुवात केली आहे.
 
म्यूच्युअल फंड्स आणि शेअर्स यांच्या तारणावर कर्जाच्या पहिल्या उत्पादनाच्या यशानंतर, हे एनबीएफसीचे अनसिक्योर्ड लोन (असुरक्षित कर्ज) क्षेत्रातील पहिले पाऊल आहे.
 
अर्जाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कर्जदारांना केवळ 10 मिनिटांत कर्जास मान्यता मिळणार आहे. अर्जापासून मंजुरीपर्यंतची ही संपूर्ण प्रक्रिया कंपनीच्या वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन केली जाऊ शकते यासाठी कोणत्याही शाखेला भेट देण्याची तसेच आवशक्यता नसून कोणतेही वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) 75,000 रुपये ते 5,00,000 रुपये पर्यंत उपलब्ध आहेत ज्याचे व्याजदर 14% प्रति वर्षापासून असून ६ ते ४८ महिन्यांपर्यंतच्या कालावधीकरिता दिले जाणार आहेत.
 
२५ हजार रुपयांपेक्षा जास्त मासिक उत्पन्न असलेल्या नोकरदारांना वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन) देऊ करणार आहे. कर्जास पात्र होण्यासाठी क्रेडिट स्कोअर किमान 700 आणि किमान 12 महिन्यांचा नोकरी केलेली असावी. सुरुवातीला, हे कर्ज भारतातील काही निवडक शहरांमध्ये उपलब्ध असून त्यासाठी वयाची अट २२ ते ५५ अशी आहे. अर्जदारांची पात्रता त्यांच्या क्रेडिट प्रोफाइल, रोजगारासंबंधी माहिती आणि पगाराच्या तपशीलाच्या आधारे तपासली जाईल.
 
"वैयक्तिक कर्जाच्या माध्यमातून नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आम्ही उचलेले आहे. वैयक्तिक कर्जाच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू आणि आणखी चांगली आणि सक्षम सेवा आम्ही देऊ असा विश्वास मिरे एसेट फाइनेंशियल सर्विसेस (इंडिया) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कृष्ण कन्हैया यांनी बोलताना दाखविला. भविष्यात वैयक्तिक कर्ज पुरवठ्यात सर्वात विश्वसनीय आणि विश्वस्त ब्रँड पैकी एक बनणे ध्येय आहे. हे आमच्या नवीन उत्पादनामधून दिसून येईल जेथे आम्ही ग्राहकांना अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती स्पष्टपणे देतो. आम्ही आमच्या समूहाच्या ग्राहक प्रथम या मूल्यासह पुढे जाऊ आणि आमच्या ग्राहकांना त्यांच्या आर्थिक प्रवासात सतत मदत करू. असेही ते पुढे म्हणाले”
 
वैयक्तिक कर्जाची (पर्सनल लोनची) सुरुवात हे नेट इंटरेस्ट मार्जिन (NIM) आणि मजबूत कर्ज बुक तयार करणे यासाठी एक धोरणात्मक पाऊल आहे व ते अधिक पारदर्शक आणि त्वरित मिळावे या करिता मिरे एसेट फाइनेंशियल सर्विसेस वचनबद्ध आहे.
 
मिरे एसेट फाइनेंशियल सर्विसेस (इंडिया) चे अनसिक्योर्ड लोन (असुरक्षित कर्ज) व्यवसाय प्रमुख अरुण शर्मा यांनी म्हटले की, "आम्ही असुरक्षित कर्ज बाजारात प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहोत. टीमने या उत्पादनाच्या विकासात प्रचंड परिश्रम घेतले आहेत, आधुनिक ग्राहकांच्या अपेक्षांवर लक्ष केंद्रित केले आहे - पारदर्शकता, गती आणि चांगल्या सोयीसुविधा आम्हाला विश्वास आहे की कर्जदार या उत्पादनाचे उत्साहाने स्वागत करतील.”

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार