सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यातील हिट अँड रन अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल अटकेत

ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी शिवानी अग्रवाल हिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Shruti Patil
  • Jun 1 2024 10:24AM

पुणे: पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन अपघात प्रकरणातील अपघात प्रकरणातील मोठी घडामोड समोर आली आहे. या अपघातालाbजबाबदार ठरलेल्या अल्पवयीन आरोपीच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला पोलिसांनी अटक केली आहे. ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणी शिवानी अग्रवाल हिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

आरोपीचं रक्त बदलून एका महिलेचे रक्त देण्यात आल्याची चर्चा आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या बदल्यात जे रक्त दिलं गेलं, ते शिवानी अग्रवाल यांचं होतं का? त्यांनी कुणाला फोन करुन मुलाला वाचवण्यासाठी मदत मागितली? अपघाताचा ब्लेम कोणाला डोक्यावर घेण्यास सांगितलं? असे सगळे प्रश्न त्यांना चौकशीदरम्यान विचारण्यात येऊ शकतात.

अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार झाल्याचं उघड झाल्यावर शिवानी अग्रवाल काही काळ बेपत्ता होत्या. मात्र अखेर आज पुणे पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान आज सकाळी ११:३० वाजता शिवानी अग्रवालच्या समोर पुणे पोलिस अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार