सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मनमाडला ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात आरपीएफ इन्स्पेक्टर संदीप देसवाल यांच्यावर गुन्हा दाखल

दारू पिऊन सरकारी गाडी चालवत अपघात केल्याप्रकरणी मनमाड येथील आरपीएफ इन्स्पेक्टर यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची घटना मनमाड शहरात घडली आहे.

Sudarshan MH
  • Jul 31 2024 4:22PM

मनमाड: रक्षकच बनले भक्षक या प्रमाणे नोकरी चा दुर उपयोग करुन दारू पिऊन सरकारी गाडी चालवत अपघात केल्याप्रकरणी मनमाड येथील आरपीएफ इन्स्पेक्टर यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची घटना मनमाड शहरात घडली आहे. दारू पिऊन बेजबाबदारपणे गाडी चालवत अपघात केल्यानंतर समोरच्या व्यक्तीलाच आपल्या पदाचा गैरवापर करत शिवीगाळ व धमकावल्या प्रकरणी तसेच महिलांना देखील अर्वाच भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी संबंधित इन्सपेक्टर वर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर घटना अशी की येथील आय यु डीपी भागात राहणारे अमोल दंडगव्हाळ हे त्यांच्या घरासमोर मोटरसायकल क्रमांक एम एच 41 एस 32 45 वर आपल्या सात वर्षाच्या मुलीसोबत बसलेले होते या ठिकाणी मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकावरील आरपीएफ इन्स्पेक्टर संदीपकुमार सुदेशसिंग देसवाल हे सरकारी गाडी क्रमांक एम एच 41 ए एस ७८६१ यांनी मागून येऊन गाडीला धडक दिली या धडकेत गाडी पडली यातून मी मुलीला वाचवले देसवाल यांनी गाडीची काच खाली करून उलट मलाच शिवीगाळ करायला सुरुवात केली हा सर्व प्रकार घरातील लोकांनी ऐकल्यानंतर ते बाहेर आले देशवाल यांनी त्यांना देखील शिव्या करण्यास सुरुवात केली घरातील महिलांना देखील त्यांनी यावेळी शिवगाळ केली यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे माझी पोस्ट काय आहे मी इथेच कपडे काढून तुम्हाला मारझोड करत घेऊन जाईल असे उत्तर दिले यानंतर दंडगव्हाळ यांनी मनमाड शहर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली व भारतीय इन्स्पेक्टर संदीप देशवाल यांच्या विरोधात दारू पिऊन सरकारी गाडी बेजबाबदार पणे चालविण्याबद्दल तसेच घरातील महिला व लहान मुलीला अर्वाचे भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी विविध कलमान्वये फिर्याद दिली आहे मनमाड शहर पोलिसांनी सुरुवातीला नेहमीप्रमाणे टाळाटाळ केली मात्र घटनेची सत्यता व गांभीर्य बघून त्यांनी उशिरा आर पी एफ इन्स्पेक्टर संदीप देशवाल यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून घेतला पुढील तपास पोलीस करत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार