मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधत हल्लाबोल केला आहे. ते त्यांच्या मुळगावी दरेगाव येथे बोलत होते. इतिहास गद्दारांना कधीच माफ करणार नाही, हे बरोबर आहे. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. ज्यांनी बाळासाहेबांशी बेमानी केली, गद्दारी केली त्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही. साहेबांनी सांगितलं होतं, की काँग्रेससोबत जायचं नाही हे काँग्रेससोबत गेले, असा हल्लाबोल यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केला आहे.
यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की साहेबांचे नकली खोटे आवाज काढून कोणी लोक यांच्याकडे येणार नाहीत. जर असली असाल तर तुम्हाला नकली आवाज काढण्याची गरज काय? हा पोरकटपणा आहे, हा थिल्लार पणा आहे. बाळासाहेबांना वेदना देण्याचं, बाळासाहेबांचा अपमान करण्याचं हे काम आहे. साहेब असते तर त्यांनी त्यांना चाबकाने फटकारलं असतं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी शिक्कामोर्तब केलं, नकली लोकांना नाकारलं आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्यांना स्विकारलं. इतिहास गद्दारांना कधीच माफ करणार नाही हे बरोबर आहे, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, ज्यांनी बाळासाहेबांशी बेमानी केली गद्दारी केली त्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही. साहेबांनी सांगितलं होतं काँग्रेस सोबत जायचं नाही हे काँग्रेस सोबत गेले, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.