सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जिहाद्यांनी केलेल्या नाशिक दंगलीचा कट पूर्वनियोजितचं! 'डम्प डेटा’ उलगडणार वास्तव; १५०० जणांवर ४२ कलमांनुसार गुन्हा दाखल

नाशिक दंगलीतील हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून नाशिक, मालेगाव, धुळे येथील ७७ पेक्षा जास्त संशयास्पद दुचाकी वाहने घटनास्थळी आढळले आहे.

Sudarshan MH
  • Apr 19 2025 10:55AM

नाशिक: नाशिक येथील काठे गल्लीसमोरील अनाधिकृत सातपीर दर्ग्याचे अतिक्रमण निष्कासित करण्यापूर्वी पखालरोड व उस्मानिया कॉर्नर येथे मंगळवारी पहाटे दोन हजारांहून अधिकच्या जिहाद्यांच्या जमावाने पोलिसांवर कट रचून हल्ला चढविला होता. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून नाशिक, मालेगाव, धुळे येथील ७७ पेक्षा जास्त संशयास्पद दुचाकी वाहने घटनास्थळी आढळल्याने पोलिसांनी आता मुख्य सूत्रधारांचा शोध सुरु केला आहे.

 
या दंगलीनंतर सध्या परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात असून व्यवहार, वाहतूक पूर्ववत होत आहेत. तसेच ३० जणांना अटक झाली असून एका विधिसंघर्षित बालकास सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. येथील सातपीर दर्गा व त्यावरील बांधकाम उच्च न्यायालयाने अनाधिकृत ठरविल्यानंतर नाशिक महानगरपालिकेने बुधवारी, दि. १६ रोजी सकाळी ते पाडले. तत्पूर्वी मंगळवारी, दि. १५ रोजी रात्री पावणे एक वाजता दोन ते अडीच हजार जिहाद्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून या कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजी करुन एकवीस पोलिसांवर दगडफेक केली होती.
 
या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. तसेच पाठलाग करून त्यांची धरपकड केली होती. आता या दंगल प्रकरणातून अतिशय धक्कादायक अशी माहिती उघड झाली आहे. तपासात हा जमाव तसेच दंगलीचा कट पूर्वनियोजित होता, असे पोलिसांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्याचे पुरावे मिळाले असून १६ ऑगस्ट रोजी म्हसरुळ टेक येथे घडलेली दगडफेक, तसेच २२ फेब्रुवारी रोजी काठे गल्लीत दोन गटांत झालेला तणाव आणि १५ एप्रिल रोजी पखाल रोड येथे घडलेला पोलिसांवरील हल्ला, अशा घटनांची शृंखला विशेष पोलीस पथक पडताळून पाहत आहे. तसेच, संशयितांकडे सखोल चौकशी सुरु आहे.
 
दंगलीच्या कटावेळी रात्री अचानक दोन हजार संशयित एकत्र झाल्याने त्यांचे मोबाईल लोकेशन व उपस्थिती आता तपासली जाणार आहे. यातून स्थानिक व बाहेरील संशयितांची नेमके नाव व पत्ते समोर येणार आहेत. गुन्हे तपासासह पुराव्यादृष्टीने हा डेटा कामी येणार आहे. डम्प डेटाच्या मॅपिंगनुसार, नेमके संशयित हेरले जाणार असून त्यांची ओळख पटणार आहे.
 
पोलिसांवर हल्ला व जमाव जमविल्याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात एकूण १५०० जणांवर भारतीय न्याय संहितेची कलमे, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान, शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम व पोलीस (अप्रितीची भावना चेतावने) अधिनियम अशा ४२ हून अधिक कलम व अधिनियमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तशी फिर्याद सहायक निरीक्षक सतीश शिरसाठ यांनी सरकार पक्षाच्यावतीने दिली आहे. तर, तपास सहायक निरीक्षक सुधीर पाटील करत आहेत. अटकेतील संशयितांना जामीन मिळण्याची शक्यता धूसर आहे.
 
या दंगलीतील आरोपी जिहादी आरीफ हाजी पटेल उर्फ शेख, फईम शेख, हनिफ बशीर, दाऊद शेख यांनी कट रचून प्रत्यक्ष तसेच सोशल मीडियाद्वारे भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता आणि अखंडता धोक्यात आणण्याच्या उद्देशाने जमावास चिथावणी दिली. तेव्हा जमावाने पोलिसांना शिवागीळ करुन त्यांच्याबद्दल अफवा पसरविली. यानंतर संशयित अकिल मुनीर सैय्यद (वय २४), अरमान अंदर शेख (वय ३२, दोघे रा. गुलशननगर, वडाळा गाव, तौफीक अय्यूब तांबोळी (वय ३७, रा. रजा मजीदजवळ, पंचशीलनगर, नाशिक), सलीम जुनैद शेख (वय २४, रा. जीपीओ रोड, खडकाळी), अबीदखान नसीरखान पठाण (वय ५४, रा. द्वारकानगरी, वडाळागाव), मीराज अब्दुल अन्सारी (वय ५७, रा. रिलायबल क्लासिक, अशोका मार्ग), सादीक अन्वर शेख (वय १९, रा. सह्याद्री हॉस्पिटलजवळ) माझ मिराज अन्सारी, मोठा दहशत, सोनू शेख, शेरु शेख उर्फ पत्र्या, सूरमा, बंटी उर्फ अखिल पीर, मोहम्मद अहमद उर्फ अनिकेत गणेश पाटील, मोहिश रंगरेज, मुजाहिद सईद शेख व इतर १५०० जणांवर कारवाई झाली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार