पुणे: राज्यात इयत्ता पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सक्तीने हिंदी शिकवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाला शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातून तीव्र विरोध करण्यात येत असतांना आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानेही हिंदीची सक्ती न करण्याची ठाम भूमिका जाहीर केली आहे. राज्य शासनाने हा निर्णय तातडीने रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची शालेय शिक्षणाच्या स्तरावर अंमलबजावणी २०२०५ - २६पासून करण्याबाबतचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने बुधवारी प्रसिद्ध केला. त्यानुसार पहिलीपासून अभ्यासक्रमात हिंदी विषयाचा समावेश करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात तसेच राजकीय पक्षातून या निर्णयाविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. त्याचबरोबर आता अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळांनी ही हिंदीची सक्ती न करण्याची ठाम भूमिका जाहीर केली आहे.