रत्नपुर: छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील नंद्राबादजवळील हॉटेल जुन्या पंचवटीसमोर कारचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाल्याची घटना घडली. बुधवारी सायंकाळी साडेपाचला अपघात झाला.
अपघातात अक्षय संतोष गाडेकर (वय २३) गंभीर जखमी झाला. उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. विजय सुखदेव जाधव (वय २२, रा. रत्नपुर ) किरकोळ जखमी झाला आहे. या अपघाताने रत्नपुर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
- गौरव जोंधळे...